महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती ! 10वी आयटीआय उत्तीर्णाना एसटी महामंडळमध्ये नोकरीची संधी : ST Mahamandal Bharti 2024

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 10 वी व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवीन भरती काढण्यात आलेली असून या अंतर्गत उमेदवारांना नोकरीची चांगली संधी दिली जात आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख किंवा अंतिम मुदत 26 मार्च 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे.

एसटी (ST) महामंडळमध्ये अर्ज सादर करताना उमेदवारांना आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करावी लागेल. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, पदाचे नाव, नोकरी ठिकाण इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे.

🔔 भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

🔔 पदाचे नाव : मेकॅनिकल मोटार व्हेईकल, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, मेकॅनिकल डीजल, पेंटर जनरल, मेकॅनिकल रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर, वेल्डर (शिकाऊ उमेदवार)

🎱 एकूण पदसंख्या : 110 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांचे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मेकॅनिक मोटार व्हेईकल10वी आणि ITI मोटर मेकॅनिक उत्तीर्ण आवश्यक
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर10वी आणि पदाशी संबंधित ट्रेड उत्तीर्ण आवश्यक
मेकॅनिकल (डीझेल)10वी आणि ITI डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण आवश्यक
पेंटर जनरल (Painter)10वी आणि ITI पेंटर उत्तीर्ण आवश्यक
मेकॅनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर)10वी आणि ITI मेकॅनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर) ट्रेड उत्तीर्ण आवश्यक
वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिकल)10वी आणि ITI वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिकल) उत्तीर्ण आवश्यक

💁 वयोमर्यादा : संबंधित भरतीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.

💸 अर्जासाठी शुल्क : खुल्या प्रवर्गातील शिकाऊ उमेदवारासाठी रु. 590/- मागासवर्गीय उमेदवारासाठी रु. 295/-

💰 वेतनश्रेणी/मानधन : निवड झालेल्या उमेदवारांना महामंडळाकडून ठरविण्यात आलेल्या नियमानुसार मानधन देण्यात येईल.

✈️ नोकरी ठिकाण : बुलढाणा महाराष्ट्र

📇 छापील अर्ज मिळण्याचे ठिकाण : राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापूर रोड, बुलढाणा

🌎 अर्जाची प्रक्रिया : ऑनलाईन/ऑफलाईन

शेवटची तारीख : 26 मार्च 2024

📒 आवश्यक कागदपत्र : खालीलप्रमाणे 👇

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • एस.एस.सी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • आयटीआय गुणपत्रक (संपूर्ण सेमिस्टर)
  • आधारकार्ड छायांकित प्रत
  • नॉन क्रिमिलियर (आवश्यक असल्यास)
  • पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या अर्जाची प्रत
संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For ST Mahamandal Bharti 2024

  • संबंधित भरतीसाठी उमेदवाराला सर्वप्रथम अप्रेंटीशीपच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून अर्ज करावा लागेल.
  • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्र व संबंधित अर्जाची प्रत राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालयात जमा करावी लागेल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व अचूक टाकावी, त्यानंतरच अर्ज दाखल करावा.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रत जाहिरातीत नमूद पत्त्यावर दाखल करावी लागेल, अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 मार्च 2024 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीतच उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
  • संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment