श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी ! पगार 15 हजारांपासून लाखापर्यंत, आताच अर्ज करा

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून यांची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना online अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे. या विहित मूदतीतच उमेदवारांना अर्ज करावा लागेल.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरतीसाठी अर्ज कसा करावा? यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फीस, वेतनश्रेणी, अर्जाची पद्धत, शेवटची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

🔔 भरती विभाग : मंदिर संस्थान विभाग

🔔 पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी 02, जनसंपर्क अधिकारी 01, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई

🎱 एकूण पदसंख्या : 47 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता पदनिहाय खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
नेटवर्क इंजिनियरमान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
हार्डवेअर इंजिनियरमान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
सॉफ्टवेअर इंजिनियरमान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
लेखापाल1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून बाणिज्य शाखेतील पदवीधारक आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
जनसंपर्क अधिकारी 021) बैचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
जनसंपर्क अधिकारी 011) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
अभिरक्षक1) प्राणीशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा प्राचीन इतिहास किंवा प्राचीन संस्कृती किंवा पुरातत्वशास्त्र या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर पदवी असणे 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
भांडारपाल1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील
सुरक्षा निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि 3) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)
स्वच्छता निरीक्षक 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
सहाय्यक जनसंपर्क अधिकारी1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपन्न
सहाय्यक स्वच्छता निरीक्षक 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
प्लंबर1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
मिस्त्री1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
वायरमन  1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
लिपिक टंकलेखक1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.
संगणक सहाय्यकसंगणक शाखेतील पदवी किवा समकक्ष अहंता
शिपाईमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष यादरम्यान असावे.

💸 अर्जासाठी शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 1,000/- मागासवर्गीय प्रवर्ग/आ.दु.घ/अनाथ उमेदवारांसाठी रु. 900/-

💰पगार/वेतनश्रेणी : रु. 15,000/- ते 1,22,800/- रु. पर्यंत

✈️ नोकरी ठिकाण : तुळजापूर (महाराष्ट्र)

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 अर्जाची सुरुवात : 23 मार्च 2024

शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
  • याव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक व इतर पात्रता नक्की तपासावी.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्र जशाप्रकारे शैक्षणिक कागदपत्र, फोटो, सही योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून ठेवावीत.
  • अर्ज काळजीपूर्वक व संपूर्ण भरावा अन्यथा अर्ज अपूर्ण, चुकीचा आढळून आल्यास रद्द करण्यात येईल.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 देण्यात आली आहे.
  • या भरतीच्या अधिक माहिती करिता वरील रखान्यात देण्यात आलेली संपूर्ण PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment