रेल्वे विभागात विविध पदांच्या एकूण 9144 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघाली ! Indian Railway Bharti 2024

भारतीय रेल्वे विभागाकडून सर्वात मोठी भरती निघालेली असून या भरती अंतर्गत तब्बल 9144 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मोठ्या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागांतर्गत तंत्रज्ञ पदाच्या या रिक्त जागा असणार आहेत, संबंधित जागेसाठी 10वी व ITI पास पास उमेदवारांना मोठी संधी असणार आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 देण्यात आली आहे.

सदर भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज कसा करावा? शैक्षणिक पात्रता काय असेल? अर्जाची पद्धत, वयोमर्यादा, अर्जासाठी शुल्क, अर्ज प्रक्रिया, भरतीचा कालावधी, शेवटची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

🔔 भरती विभाग : रेल्वे मंत्रालय विभाग

🔔 पदाचे नाव : तंत्रज्ञ (Technician)

🎱 एकूण पदसंख्या : 9144 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : तंत्रज्ञ या पदाची शैक्षणिक पात्रता पदानुसार व स्तरानुसार खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ ग्रेड IBSC किंवा इंजीनियरिंग डिप्लोमा
तंत्रज्ञ ग्रेड III10वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील ITI ट्रेड

💁 वयोमर्यादा : संबंधित भरतीसाठी 18 ते 36 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्जासाठी पात्र असतील. (मागासवर्गीयांना वयोमर्यादेत सूट मिळेल)

💸 अर्जासाठी शुल्क : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 500, एससी/एसटी/महिला – रु. 250

💰 पगार/वेतनश्रेणी : रेल्वे विभागाकडून ठरविण्यात आलेल्या नियमानुसार पात्र उमेदवारांना वेतनश्रेणी देय असेल.

💡 निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये असेल, ज्यामधील पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी, दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी, अंतिम टप्पा वैद्यकीय तपासणी असेल.

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📋 परीक्षा वेळापत्रक : ऑक्टोबर व डिसेंबर 2024

📅 अर्जाची सुरुवात : 09 मार्च 2024

शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Railway Technician Bharti 2024

  • उमेदवारांना या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात स्वतः काळजीपूर्वक वाचून घ्यावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • फॉर्म भरण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता व इतर मूलभूत माहिती काळजीपूर्वक वाचून त्या पद्धतीनेच फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरत असताना स्वतःबद्दलची माहिती खात्रीपूर्वक योग्य असल्याची पडताळणी करून अंतिम अर्ज सबमिट करा.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीतच आपला फॉर्म सादर करा.
  • रेल्वेच्या या तंत्रज्ञ भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अधिक माहिती हवी असल्यास वरील रखान्यात देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Leave a Comment