10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 30,000+ जागांसाठी मेगाभरती निघाली : India Post Bharti 2023

India Post Bharti 2023 : मागील काही दिवसापूर्वी भारतीय डाक विभागात BPM, ABPM या पदासाठी भरती निघाली होती. आता परत नव्यानं डाक विभागाकडून 10वी पास उत्तीर्ण उमेदवारांसाठी मेगाभरती सुरू करण्यात आलेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरच्या भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

🔔 एकूण रिक्त पदसंख्या : 30,000+ जागा

📚 शैक्षणिक पात्रता : : (i) उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र म्हणजेच Ms-Cit प्रमाणपत्र किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र आवश्यक

इतर आवश्यक पात्रता : डाक विभागातील या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सायकल चालवता यावी, संगणकाच थोडं फार ज्ञान असावं आणि उपजीविकेचा पुरेसं साधन असावं.

💁 वयोमर्यादा : 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (एससी/एसटी उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट)

💸 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/ईडब्लूएस : रू. 100/- (एससी/एसटी/अपंग/महिला – फीस नाही)

💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇

  • GDS – ब्रांच पोस्ट मास्टर – 10,000/- ते 24,470/
  • GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर- 12,000/- ते 29,380/-

💁 निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड दहावीच्या गुणावर केली जाईल, अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2023

📅 अर्जात बद्दल करण्याची तारीख : 24 ते 26 ऑगस्ट 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा

How to apply for india Post Bharti 2023

  • भारतीय डाक विभागाच्या या मेगाभरतीसाठी उमेदवारांना डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही वेबसाईटवर अथवा माध्यमातून अर्ज करण्यात आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी डाक विभागाकडून देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करत असताना सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्यता प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • संपूर्ण अर्ज भरला झाल्यानंतर सर्व माहिती आवश्यक पडताळणी करावी त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment