BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दलांतर्गत विविध पदांच्या एकूण 166 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात सीमा सुरक्षा दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत किंवा शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 देण्यात आलेले आहे.
🔔 पदाचे नाव : उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल
🔔 एकूण पदसंख्या : 166
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
उपनिरीक्षक | केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण. |
हेड कॉन्स्टेबल | a) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक पास किंवा समकक्ष, b) केंद्र किंवा राज्य सरकारच्या विषयाद्वारे मान्यताप्राप्त फर्मकडून संबंधित व्यापारातील तीन वर्षांचा अनुभव असलेले मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित व्यापारातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र |
कॉन्स्टेबल | मान्यताप्राप्त संस्थेकडून ट्रेडमध्ये प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल |
💸 अर्जासाठी शुल्क : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी.
💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇
- उपनिरीक्षक – 35,400 ते 1,12,400/-
- हेड कॉन्स्टेबल – 25,500 ते 81,100/-
- कॉन्स्टेबल – 21,700 ते 69,100/-
💁 निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, शारीरिक मानक चाचणी, मुलाखत, वैद्यकीय तपासणी, अंतिम गुणवत्ता चाचणी
🌐 अर्जाची पद्धत : ऑफलाईन
📅 शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023
संपुर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
How To Apply For BSF Recruitment 2023
- सदरच्या भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अर्ज भरत असताना काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावा कारण अर्जामध्ये अपूर्णता असल्यास उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र जोडावीत जेणेकरून नंतर अर्जामध्ये त्रुटी येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने दक्षता घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.