Bank Of India Bharti 2024 : बँक इंडियामध्ये नौकरीची सुवर्णसंधी, त्वरित ऑनलाईन अर्ज करा

भारतातील नामांकित बँकेपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरक्षा अधिकारी या पदासाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात बँकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदरची भरती एकूण 15 जागांसाठी असेल या रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईटवर विहित मुदतीत म्हणजेच 3 एप्रिल 2024 पूर्वी सादर करावी लागतील.

संबंधित भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार/वेतनश्रेणी, अर्जासाठी शुल्क, अर्जाची पद्धत, नोकरी ठिकाण इत्यादी बद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, तदनंतरच अर्ज सादर करावा.

🔔 पदाचे नाव : सुरक्षा अधिकारी (Security Officer-MMGS-II)

🔔 एकूण पदसंख्या : 15 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : सुरक्षा अधिकारी या पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुरक्षा अधिकारी (Security Officer-MMGS-II)उमेदवार कोणतेही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असावा + कम्प्युटर क्षेत्रातील कोणताही तीन महिन्याचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक

💸 अर्जासाठी शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी रु. 850 (एससी/ एसटी प्रवर्गासाठी रु. 175) शुल्क आकारण्यात येईल.

💰 पगार/वेतनश्रेणी : 48,170 ते 69,810 रु. दरमहा

✈️ नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 एप्रिल 2024

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
जाहिरात शुध्दीपत्रकयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to Apply For Bank Of India Recruitment 2024

  • संबंधित भरतीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • ऑनलाइन रजिस्ट्रेशन करत असताना उमेदवारांनी सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक टाकावी.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे, इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करत असताना सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी देणे अनिवार्य आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सबमिट केल्यास उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 3 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे.
  • या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment