Assam Rifles Bharti 2023 : आसाम रायफल्समध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघालेल्या असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरची भरती एकूण 161 रिक्त जागांसाठी असेल. जाहिरातीत नमूद पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना आँनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 देण्यात आलेली आहे.
🔔 पदाचे नाव : पर्सनल असिस्टंट, धार्मिक शिक्षक, लाईनमन फिल्ड, रिकव्हरी व्हेईकल मेकानिक, ब्रिज अँड रोड, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन, प्लंबर, सर्वेअर, एक्स-रे असिस्टंट इत्यादी
🔔 एकूण पदसंख्या : 161 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : सर्व पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
---|---|
पर्सनल असिस्टंट | (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) |
धार्मिक शिक्षक | (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण |
लाईनमन फिल्ड | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) |
रिकव्हरी व्हेईकल मेकानिक | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रिकवरी व्हेईकल मेकॅनिक/ऑपरेटर) |
ब्रिज अँड रोड | (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल | इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी |
ड्राफ्ट्समन | i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा |
प्लंबर | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) |
सर्व्हेअर ITI | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर) |
एक्स-रे असिस्टंट | (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा |
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षापर्यत असावे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
💸 परीक्षा फीस : खालीलप्रमाणे👇
- पद क्र.2 & 5 (ग्रुप B): रु. 200/-
- पद क्र.1,3,4, & 6 ते 10 (ग्रुप C): रु. 100/-
- SC/ST/ExSM/महिला: फी नाही
💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी देण्यात येईल.
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌐 अर्जाची प्रक्रिया : ऑनलाईन
📅 भरती मेळाव्याची तारीख : 18 डिसेंबर 2023
⏰ शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How to apply for Assam Rifles Bharti 2023
- आसाम रायफल्समार्फत राबविण्यात येणारी ही भरती ऑनलाईन होणार आहे.
- उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचा असून इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून आपला युजरनेम व पासवर्ड मिळवावा.
- त्यानंतरभारतीय आसाम रायफल्सच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे आणि संबंधित पदासाठी अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी प्रोफाइलमध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक भरण्याची खात्री करून घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीत उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.