Crop Insurance : बाप रे ! इतिहासात पहिल्यांदाच इतक्या शेतकऱ्यांनी भरला पिक विमा, आज शेवटची तारीख

बळीराजाला शेतामध्ये काम करत असताना अनेक संकटांना सामोरे जावं लागते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अवकाळी पाऊस, पूर, अतिवृष्टी इत्यादी असेल अशा विविध संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. या कारणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, त्याचप्रमाणे त्यांना मानसिक त्राससुध्दा सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता, यावर्षी राज्यशासनाकडून शेतकऱ्यांच्या हितार्थ एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे एक रुपयात पिक विमा योजना, या योजनेचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर लाभ घेताना दिसून येत आहे.

देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा भरलं असल्याची माहिती आपल्या राज्याचे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत देण्यात आली. आतापर्यंत तब्बल पन्नास कोटी लाख शेतकऱ्यांनी 1 रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेतलेला असल्याची माहिती समोर आलेली असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पिक विमा भरलेला नसेल, त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी 03 दिवसाची वाढीव मुदतसुध्दा देण्यात आलेली होती.

आज शेवटचा दिवस

मागील काही दिवसापासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तांत्रिक अडचण असल्या कारणामुळे बहुतांशी शेतकऱ्यांकडून पिक विमा भरणा करण्यात आलेला नव्हता, पिक विमा भरण्याची शेवटची तारीख 30 जुलै होती मात्र दोन ते तीन दिवस पूर्वीच ही तांत्रिक अडचण सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती की पिक विमा भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, हीच बाब लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत तशा प्रकारची प्रस्तावना सादर करून शेतकऱ्यांना तीन दिवसाची मुदत वाढ देण्यात आली म्हणजेच तीन ऑगस्टपर्यंत पिक विमा भरण्यासाठी मदत वाढ देण्यात आलेली होती. पिक विमा भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्यात येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

राज्यातील काही भागांमध्ये मागील काही दिवसापासून पावसाने चांगलच थैमान घातलेला आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात सततच्या पावसामुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता करू नये.

ज्या शेतकऱ्यांच पावसाअभावी नुकसान झालेले असेल त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदत मिळणार आहे ज्या भागांमध्ये फळबाग उत्पादकांचे नुकसान झाले असेल त्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून कृषी विभागाच्या वतीने त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही सुद्धा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

15 ऑगस्टपासून ही रक्कम मिळणार

ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केलेली असेल, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार प्रोत्साहनपर कर्जमाफी योजना सुरू करण्यात आलेली होती, यामधील जवळपास 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली; परंतु यामधील उर्वरित 30 टक्के शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार कर्जमाफी अनुदानाची रक्कम 15 ऑगस्टनंतर त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाईल. अशी माहितीसुध्दा संबंधित विभागाकडून देण्यात आलेली आहे.

Leave a Comment